पालकमंत्र्यांच्या हस्ते मेहरुण येथे जलपूजन मेहरूण तलाव सुशोभिकरणतंर्गत गणेश घाटाचे उद्घाटन

0

जळगाव । जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गाळ काढून खोलीकरण केलेल्या जळगाव शहरातील मेहरूण तलावातील जलसाठ्याचे राज्याचे महसूल,मदत व पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. नाना पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आ. किशोर पाटील, आ. उन्मेष पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. चंदूभाई पटेल, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी सभापती वर्षा खडके, नगरसेवक सुनील महाजन, नितीन बरडे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, सीईओ आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, आयुक्त सोनवणे आदी उपस्थित होते.