पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’चे उद्घाटन

0

नगराध्यक्ष रमण भोळे यांची पत्रकार परीषदेत माहिती; 50 वर्षांचा पाणीप्रश्‍न सुटणार

भुसावळ: भुसावळच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, अशा अमृत योजनेचा शनिवार, 30 रोजी सकाळी 10 वाजता जलशुध्दीकरण केंद्राच्या आवारात शुभारंभ होत असून या योजनेमुळे आगामी तब्बल 50 वर्षांचा पाणीप्रश्‍न सुटणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी गुरूवारी दुपारी काच बंगल्यावर आयोजित पत्रकार परीषदेत दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ होईल. जलसंपदामंत्री गिरीष महाजन, लोकनेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर उपस्थित राहतील. नियोजित निविदेपेक्षा सात टक्के जास्तीची रक्कम देण्यात आली असली तरी नगर विकास विभागाशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी दिली. या योजनेत सहभागासाठी लागणारा निधी अधिक असला तरी अडचणीतून आम्ही निश्‍चित मार्ग काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक रमेश नागराणी, वसंत पाटील, प्रा.दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, प्रा.सुनील नेवे, पुरूषोत्तम नारखेडे, बापू महाजन, गिरीश महाजन, रमाशंकर दुबे, सुमीत बर्‍हाटे, पवन बुंदेले, परीक्षीत बर्‍हाटे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, सतीश सपकाळे आदींची पत्रकार परीषदेस उपस्थिती होती.