पुणे । शेतकरी समाजाला न्याय देण्यास आजचे सरकार अपयशी ठरले आहे, म्हणून सरकारचे प्रतिनिधी असलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन करू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने केली आहे. पुणे जिल्ह्यात डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात सुकाणू समितीतील सहभागी सर्व पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते 15 ऑगस्टला सकाळी 8 वाजता साधू वासवानी चौकात जमून विधानभवन येथे सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. त्याच वेळी पालकमंत्र्यांनी झेंडावंदन करू नये, अशी मागणी करणार आहेत.
आम्हाला राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे. झेंडावंदन माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक किंवा शहीद सैनिकाच्या विधवा पत्नीच्या हस्ते व्हावे, असे सुकाणू समितीचे सदस्य रणसिंग यांनी स्पष्ट केले आहे.