भुसावळ : सध्या कोरोना व्हायरसमुळे राज्यातीलच नव्हे, तर देशातील जनजीवन ठप्प झाल्याचे चित्र आहे. शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत मात्र बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन विद्यार्थी हितासाठी अग्रेसर असणार्या भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयानतर्फे मोफत ऑनलाइन सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
पालकांच्या आग्रहास्तव नोंदणीस मुदतवाढ
विद्यार्थ्यांना ऑनलाइन सीईटीची भीती वाटू नये, त्याच धर्तीवर सर्वच परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, ही बाब लक्षात घेऊन दिनांक 12, 15 आणि 18 जून 2020 रोजी रोजी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. आता पर्यंत 350 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून पालक व विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव नोंदणी अर्जाला मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.
ऑनलाईन नोंदणी आवश्यक
नवीन तंत्रज्ञान, मोबाईल, इंटरनेट याबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा होताना दिसतात. मात्र, त्याच तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून सराव परीक्षेसाठी https://tinyurl.com/ssgbcoet या लिंकवर नोंदणी सुरू केली असून संपूर्ण माहिती www.ssgbcoet.com `या वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी दिली.