ऑरिगोन : प्राण्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, शारीरिक ठेवण, विशिष्ट रोग आदी पेशीत असलेल्या केंद्रकात स्थित असलेला डीएनए निश्चित करीत असतो. ऑरिगोन हेल्थ अँड सायन्स विद्यापीठाचे वैज्ञानिक शौख्रत मितालिपॉव्ह यांनी सीआरआयएसपीआर या तंत्राने मानवी गर्भाच्या काही दोषपूर्ण गुणवैशिष्ट्यात बदल साधला आहे.
मितालिपोव्ह यांच्या सहकाऱ्यांनी अचानक डीएनमध्ये बदल झालेल्या पुरुषाचे शुक्र जंतू आणि स्त्रीबीजाच्या संयोगातून निर्मित गर्भांवर प्रयोग केले. सीआरआयएसपीआर तंत्राचा वापर करून त्यांनी जनुकांमध्ये बदल केला.
चीनी वैज्ञानिकांनी दोषपूर्ण मानवी गर्भांमध्ये असे बदल केलेले आहेत परंतु मितालिपोव्ह यांना यात त्यांच्यापेक्षा चांगले यश मिळाले आहे. या संशोधनामुळे गर्भावस्थेतच अर्भकांमधील संभाव्य रोग टाळणे शक्य होणार आहे. पालक त्यांना हवे त्या गुणवैशिष्ट्याची मुले व्हावी म्हणून आग्रह धरतील. त्यासाठी काहीही किंमत मोजतील, अशी दुसरी धोकादायक बाबही शास्त्रज्ञांना व्यथित करीत आहे. अमेरिकेत या प्रकारांना बंदी आहे.
मितालिपोव्ह अशा जिन थेरपीमुळे नेहमी वादच्या भोवऱ्यात सापडतात. त्यांनी २००७ आणि २०१३ मध्ये माकडांचे स्टेम सेलचे क्लोनिंग करून प्रतिमर्कटे जन्मास घातली होती. आधीही म्हणजे २०१५ मध्ये मानवी गर्भाच्या डीएनएत बदल करण्यात आले होते परंतु गर्भातील दोष अतिशय गंभीर असतानाच हे बदल केले होते.