पालकांनीच विकले मुलीला

0

बरेली :- उत्तर प्रदेशमधील संभळमध्ये २०१० साली एका आठ वर्षांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांनीच राजस्थानमधील एका माणसाला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने वडील, सावत्र आई व मावशीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी आता 16 वर्षांची असून ती चार मुलांची आई आहे. याबाबतचे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्त पत्राने प्रसिद्ध केले आहे.

उन्नाव, कथुआ, सूरत सारख्या घटनेने देशभरात संतापाची लाट ओसरली असतांना ही नवीन घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा जनमानसातून संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून, आईचे निधन झाल्यानंतर 2010 साली तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. घरी आलेल्या सावत्र आईने मला सतत त्रास द्यायला सुरूवात केली. पीडित मुलीला तीन बहिणी व एक भाऊ आहे. सावत्र आईने मला व माझ्या दोन लहान बहिणींना तिच्या राजस्थानमधील बहिणीच्या घरी नेलं. त्यानंतर राजस्थानमधील एका 50 वर्षीय माणसाकडे मला 3 लाख रुपयांना विकलं. माझं त्याच्याशी लग्न लावून दिले व माझं नाव बदलले. सहा वर्षात मी चार मुलांना जन्म दिला. पण त्यापैकी दोन मुलांचा त्यांच्या जन्माच्या एका महिन्यातच मृत्यू झाला, पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे.

पिडीत मुलीवर तब्बल आठ वर्ष सतत बलात्कार झाला. तिच्यावर होणारे अत्याचार असह्य झाल्यावर पीडित मुलीने भरतपूरमधील तिच्या घरातून पळ काढच संभळमधील नातेवाईकांचे घर गाठले. दरम्यान, पोलिसांनी मुलीचे वडील, सावत्र आई, मावशी व तिला विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.