पालकांनी मुलांवर आपल्या स्वप्नांचे ओझे लादू नये

0

सनदी अधिकारी हनुमंत झेंडगे यांचा सल्ला

चिंचवड : ‘पालकांनी आपल्या पाल्यांमधील विविध कला व गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कोणतेही क्षेत्र निवडले, तरी त्यात अव्वल येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या ध्येयाची पूर्तता करताना कसल्याही प्रकारचा न्यूनगंड मनामध्ये बाळगू नये. पालकांनी मुलांवर आपल्या स्वप्नांचे ओझे लादू नये’, असा सल्ला सनदी अधिकारी हनुमंत झेंडगे यांनी दिला.

काळेवाडी येथील पार्वती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलेत होते. यावेळी ज्ञानेश्‍वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सुरेश नढे, पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे खजिनदार अ‍ॅड हर्षद नढे, संस्थेच्या उपाध्यक्षा सुवर्णा नढे, प्राचार्य शीतल दवे, शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. झेंडगे यांनी 2015 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारतात 50 वा, तर राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांची आयएएस म्हणून नियुक्ती झाली असून, सध्या ते तेलंगणा कॅडरमध्ये खम्मम जिल्ह्यात प्रशासकीय जबाबदारी पार पाडत आहेत.