महिषासुराच्या रोपट्याचे वटवृक्ष तेव्हाच होते जेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता पाणी घालून त्याचे संवर्धन केले जाते तसेच लहान मुलेहीसुद्धा एक रोपटचे आहे. या लहान मुलांकडेही दुर्लक्ष न करता पालकांनी संस्काराचे पाणी घातले तर ती वटवृक्ष होतील अन्यथा वाढण्याआधीच त्यांची पाळेमुळे गळून पडतील. लहान वयातच पालकांनी आपल्या मुलांना गुड टच आणि बॅड टच यातील फरक उदाहरणासहित समजावून सांगितला पाहिजे.
मुलांमध्ये याबाबतची जनजागृती करण्यासाठी पोलीस दीदी ही मोहीम सुरू केली असून, राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला पोलीस याविषयासंबंधी मुलांना गुड टच आणि बॅड टच यातील सोदाहरणासहित स्पष्टीकरण देत आहे. पोलीस दीदी या मोहिमेची चळवळ मुलांच्या शाळेतून सुरू करण्यात आली आहे. मात्र, गुड टच आणि बॅड टच याबाबतीत पालकांनी या मोहिमेत मनापासून सहभाग घेतला, तर मुलं विकृत घटना घडण्यापासून वाचू शकतील. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांच्या एकंदरीत दैनंदिन बदलणारी वागणूक तुम्हाला त्याच्यातील चांगले आणि वाईट गोष्टी दिसून येतील.
लहान वयात मुलांना स्पर्श कळत नाही. अनेकदा आपल्याशी गोड बोलणारी, खाऊ देणारी, लाड करणारी व्यक्ती त्यांना अत्यंत जवळची वाटते. मात्र, अशा व्यक्तींवर विश्वास टाकल्यानंतर मुलांचा घात होतो. समाजातील अशा विकृत व्यक्तींच्या हाती आपली मुले अडकू नये यासाठी पालकांनी आतापासूनच मुलांमध्ये जनजागृती आणण्यासाठी त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यासंबंधी समजावून सांगितले पाहिजे. ओठ, छाती, दोन पायांच्या मधला भाग, कमरे खालचा मागील भाग शरीराचे हे चार प्रमुख भाग आहेत, मुलांच्या या भागाला फक्त आईच स्पर्श करते. मात्र, कुणी अनोळखी व्यक्तीकडून जर अशा अवयवांना हात लावून स्पर्श करण्याचा प्रयत्न होत असेल, तर मुलांना याबाबतीत पालकांनी समजून सांगितले पाहिजे. लहान वयातच आपण जे काही त्यांना शिकवू ते त्याचे अवलोकन करतात. पण चांगला किंवा वाईट यातील फरक जर आपण समजावून सांगितला नाही, तर मुलं बिथरतात आणि त्यांनाही कळत नाही की काय चाललंय अन् अखेर विकृतांकडून त्यांचा बळी जाती. सध्या घडलेल्या घटना पाहता मुलांना बोलते करण्याची, मोकळेपणाने त्यांच्या मनातील गोष्टी सांगू शकेल असे वातावरण तयार करण्याची जबाबदारीही पालकांना उचलावी लागणार आहे. कारण बाल लैगिंक हत्यांमधील किंवा अशास्वरुपाच्या घटनांमध्ये भितीमुळे मुले पालंकासमोर व्यक्त होत नाही असेही पहायला मिळाले आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये अपराध्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे मुले पालकांसमोर नेमके काय घडले आहे याची माहिती द्यायला घाबरतात हे स्पष्ट झाले आहे. अशावेळी नेमके काय झाले याची माहिती करून घेण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली जाते. पण पालकांनीच त्यादृष्टीने वातावरणनिर्मिती केलेली असेल, तर त्याचीही गरज भासणार नाही. विकृतांची नजर इतकी वाईट आहे की, मुलांचेदेखील लैंगिक शोषण करायला मागेपुढे पाहत नाही. रायन इंटरनॅशनल शाळेतील निरागस अशा प्रद्युम्न ठाकूर हा अशाच विकृताच्या जाळ्यात अडकला. प्रद्युम्नला जर वेळीच त्याच्या पालकांनी गुड टच आणि बॅड टचबाबतीत समजावले असते, तर आज प्रद्युम्नचा बळी गेला नसता.
– नीलेश मोरे
घाटकोपर, वार्ताहर
9867477598