चिंबळी- कुरूळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वर्ग खोल्या अपुर्ण पडत आहेत. त्यामुळे दोन सत्रात शाळा भरविण्यात येणार असल्याचे शाळा समितीचे अध्यक्ष चंदकात सोनवणे यांनी सांगतिले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या व व्यवस्थापन समितीच्यावतीने पालकमेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या विषयावर चर्चा करून शाळेत विद्यार्थ्यांना रोज शिकवला जाणारा अभ्यास पालकवर्गाच्या व्हॉटस्अपवर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व पालकवर्गाचे मो.नं घेण्यात आले. जुन महिन्यात बदलून गेलेल्या व नविन आलेल्या सर्व शिक्षकांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शैक्षणिक विषयावर पालकवर्गाला मार्गदर्शन करण्यात आले. सर्व मुलींना व अनुसुचित मुलांना गणेश वाटप करण्यासाठी ठराव घेण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका शोभा सुतार, शाळा समितीचे अध्यक्ष चंदकात सोनावणे, उपाध्यक्ष किशोर बांगडे, माजी सरपंच एम. के. सोनवणे उपसंरपच विद्या बांगडे, सर्व संचालक व शिक्षक उपस्थित होते.