पालखी सोहळ्यादरम्यान रिक्षा चालकांकडून लूट

0

पिंपरी-चिंचवड : शहरात काल संत तुकोबारायांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी शहरातील अनेक रस्ते बंद होते. आज जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी पुण्याकडे प्रस्थान झाले. याचाच गैरफायदा घेत अवघ्या साडेतीन ते चार किलोमीटरसाठी दोनशे, तीनशे रुपये भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जात होती. रिक्षा चालकांनी उचलला.

एरव्ही केवळ दहा रुपये आकारणारे रिक्षा चालक साडेतीन ते चार किलोमीटर अंतरासाठी साडेतीनशे रुपये भाडे आकारात होते. विशेष म्हणजे जादा भाडे आकारुनही रिक्षा थांब्यांच्या जागी न सोडता रिक्षा चालक त्यांच्या सोईप्रमाणे प्रवाशांना सोडत होते. रिक्षामध्ये मागील बाजूला कोंबून-कोंबून चार जण तर पुढेही चालकाच्या शेजारी एक-दोघांना बसवले जात होते. यामुळे नागरिकांनी रिक्षा चालकांच्या मनमानी भाडे दरावर नाराजी व संताप व्यक्त केला.