पालघर । पालघर जिल्ह्याचा तिसरा वर्धापन दिन अनोख्या शैलीत साजरा करण्यासाठी 1 ते 15 ऑगस्ट यापंधरवडयात विविध विभागांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात एका बैठकीत आढावा घेतला. 1 ऑगस्ट महसूल दिन, 7 ऑगस्ट अन्न दिन, 9 ऑगस्ट आदिवासी दिन, 14 ऑगस्ट पालघर हुतात्मा दिन, 15 ऑगस्ट वर्धापन दिन असे महत्वाचे दिनविशेष पहिल्यापंधरवडयात येत असल्याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नारनवरे यांनी सर्व अधिकार्यांना या कालावधीत सादर करण्यात येणार्या व राबविण्यात येणार्या योजनांचा आराखडा सादर करण्याच्या सुचना दिल्या.
या विशेष मोहिमेत पालघर जिल्हयातील कातकरी व आदिवासी जनतेला जास्तीतजास्त योजनांचा लाभ मिळावा या हेतूने सर्व विभागांनीकार्यक्रमांची आखणी करावी. प्रत्येकदिवस हा विशेष दिन म्हणून साजरा केला जाईल असेही ते म्हणाले. या बैठकीस उपस्थित जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी ही मोहिम अधिकचांगल्या प्रकारे राबविण्यासाठी विविध कल्पना बैठकीत मांडल्या.
विविध स्पर्धांचे आयोजन
या बैठकीत उपस्थित विविध विभागाच्या प्रतिनिधींनी मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने विविधकल्पना मांडल्या त्यात आरोग्य विभागाव्दारे रक्तदान शिबिरांचे आयोजन, आदिवासी पाडे व खेडयांमध्ये हेल्थकॅम्प, सामाजिक वनीकरण विभागाकडून बीज बॅगचे वाटप करुन ते बीज अंगणवाडयांच्या सेविका व शाळेतील विद्यार्थांच्या हस्ते बीज रोबण्याचा कार्यक्रम, विरार- वसईमहानगर पालिकेच्या वतीने सागरी किनार्याची स्वच्छतामोहिम, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रथमिक शाळांमध्येवकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचेआयोजन, कृषि विभागाकडून या पंधरवडयात पारसबागेची लागवड, जलयुक्त शिवार योजनेतील गावा मार्फतजलपुजनाचा कार्यक्रम, कृषि गट तयार करणे. जिल्हापुरवठा कार्यालयाकडून 7 ऑगस्ट अन्न दिनानिमित्त अन्नवाटप तसेच आशिर्वाद योजनेचा लाभ देणे व लाभार्थ्यांच्याप्रतिक्रिया जाणून घेणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. या वेळी पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे, आदि मान्यवर वअधिकारी उपस्थित होते.