पालघरच्या वकीलासह तिघांना मारहाण करीत सात लाख लुटले

0

वढोदा-हलखेडा शिवारातील घटना ; सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

मुक्ताईनगर- जमीन विक्रीच्या बहाण्याने वढोदा-हलखेडा शिवारात आलेल्या पालघरच्या वकीलासह तिघांना सात आरोपींनी मारहाण करीत त्यांच्याकडील सुमारे सात लाखांचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात दरोड्यासह लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपींनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत लूट केली.

जमीन व्यवहारापोटी बोलावून लुटले
पालघरचे अ‍ॅड.चंद्रशेखर पाणीग्रही यांच्यासह मुंबई रवींद्र विठ्ठल नाईक, अतुल मोहनलाल जैन (दोघे रा.मुंबई) यांना मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा हलखेडा शिवारात जमीन दाखवण्याच्या बहाण्याने संशयितांनी बोलावत आरोपी राजू भाटे, विनोद तायडे, संतोष पाटील व अन्य चौघांनी तिघा मुंबईकरांना पोलिस असल्याचे भासवून जबर चोप देत दोन अंगठ्या, पाच मोबाइलसह तीन लाख 53 हजार रुपये रोख मिळून एकूण 7 लाखांचा ऐवज लूटला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.