पालघरमधून राजेंद्र गावित यांना शिवसेनेची उमेदवारी

0

पालघर : युतीने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जागांवरील उमेदवरांच्या नावाची घोषणा केली होती, मात्र पालघरबाबतचा निर्णय होत नव्हता अखेर आज पालघरमधील उमेदवार निश्चित झाला आहे. पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पालघरची उमेदवारीसाठी भाजप, शिवसेना दोन्ही आग्रही होते, अखेर भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली आहे.

शिवसेनेचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुक भाजप शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती, त्यात भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले होते. गावित यांनी चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला होता. शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. शिवसेनेने भाजपच्या खासदारालाच उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेला तगडे उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे. साता-यात भाजपच्या नरेंद्र पाटलांना तर पालघरमध्ये भाजप खासदार राजेंद्र गावित यांना पक्षात घेवून तिकीट दिले जात असल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.