पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील जांभूळपाडा येथे एसटी बस गतिरोधकावर आदळल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. यात ४९ विद्यार्थ्यांसह ५२ प्रवाशी जखमी झाले आहे. विद्यार्थ्यांवर ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
पहाटे पिवळीहून वाड्याला जाणारी ही पहिली बस असल्याने स्वामी विवेकानंद महाविद्यालय आणि अ.ल. चंदावरकर महाविद्यालयाचे सुमारे ५० हून अधिक विद्यार्थी या बसमध्ये होते. भरधाव वेगात धावणारी ही बस गतिरोधकावर आदळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.