राष्ट्रवादीच्या डॉ.उज्ज्वला काळे यांचा विजय
पालघर-संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पालघर नगरपरिषदेत अपेक्षेप्रमाणे युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहे. मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ.उज्ज्वला काळे विजयी झाल्या आहे. त्यामुळे सत्ता युतीची आणि नगराध्यक्ष आघााडीचा अशी राजकीय स्थिती तेथे असेल. युतीने 28 पैकी 21 मिळविल्या आहे तर राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळाला आहे.
26 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात होते. त्यात शिवसेनेने 14, भाजपाने 07 असा 21 जागंवर विजय मिळवला. तर आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. पाच जागांवर अपक्ष निवडून आले असून त्यातील बहुतांश युतीतील बंडखोर आहेत. नगरपालिकेसाठीच्या जागावाटपात भाजपाला झुकते माप देत सांभाळून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने यावेळी केला होता.
पालघरच्या लोकसभा मतदारसंघाची गरज लक्षात घेऊन यंदा सेना-भाजपाची प्रथमच युती झाली. 28 जागांपैकी 17 जागी शिवसेना, तर 09 जागी भाजपा लढत होती. महायुतीत सहभागी असूनही आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नव्हती. युतीत नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, जनता दल यांची आघाडी झाली होती. राष्ट्रवादी 15, काँग्रेस 07, बविआ 05, तर जनता दल 01 जागेवर लढत होते.
१९९९ ला नगरपालिका अस्तित्वात येताच १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. तेव्हा शिवसेनेला चार, भाजपाला एक, अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. २००४ मध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, तर २५ जागांपैकी १७ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. जनाधार पार्टी तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तीन, भाजपा एक आणि बविआ एक अशी स्थिती होती. २००९ मध्ये शिवसेनेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ, अपक्षांनी एकता परिषद स्थापना केली. त्यानंतर २५ पैकी शिवसेनेने १२, काँग्रेसने पाच, राष्ट्रवादीने तीन, बविआने तीन व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेवेळी एकता परिषदेसा दोन अपक्षांची साथ दिली. २०१४ मध्ये २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने १७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला एक जागा मिळाली.