पालघर : पालघर जिल्ह्याचे निर्माण होऊन, तिसरा वर्धापन दिन साजरा झाला. मात्र, आमच्या खर्या समस्या व विवंचना आज देखील दुर्लक्षितच राहिलेल्या आहेत असे सर्वमान्य प्रश्न घेऊन विकासाच्या मुद्द्यावर मनसेचे पालघर जिल्हा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकार्यांना पालघरचे आजचं अतिशय अस्वस्थ व वास्तव दर्शन करणारे उपहासात्मक चित्र भेट व लेखी निवेदन देण्यात आले. अशा अनेक प्रश्नांच्या उपाययोजनेवर लढण्यासाठी ढिम्म प्रशासन, सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष नावाच्या त्रिकूट यंत्रणेला स्वारस्य दिसत नाही. कारण या यंत्रणेला आम्हा सर्वसामान्य जनतेबाबत काडीचीही आस्था राहिलेलीच नाही. म्हणूनच, विकासाच्या मुद्द्यावर कोसो दुर असलेल्या जिल्ह्यात आपण राहतोय याबद्दल कुणाचंच दुमत नसावं अशी संतापाची भावना कुंदन संखे यांनी या वेळी व्यक्त केली.
पुढच्या वर्धापनदिनापर्यंत प्रश्न सोडवण्याची मागणी
निदान पुढच्या वर्धापनदिनापर्यंत आपल्या माध्यमातून हे सारे प्रश्न सुटतील आणि पालघर जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावेल अशी सर्वमान्य मागणी केली ह्या विषयावर विस्तृतपणे बोलतांना जिल्ह्याधिकारी प्रशांत नरनावरे यांनी विस्तृतपणे बोलतांना आपण केलेले मुद्दे हे अतिशय रास्त असून जिल्ह्याचा विकास हा अतिशय गतिमान पद्धतीने व्हावा या करिता प्रशासन गंभीर असल्याचे म्हटले तसेच जिल्ह्यातील रोजगाराच्या मुद्यावर झालेल्या मेळाव्या बाबत सर्वे करून तसेच येथील उद्योगात 80% स्थानिक भूमिपुत्रांना घेण्याच्या परिपत्रकाच्या अंमलबजावणी संदर्भात लवकरच निर्देश देणार असल्याचे म्हटले.