ओळख न पटण्यासाठी चेहर्यावर दगड टाकून जाळण्याचा प्रयत्न
सावदा : पाल येथील घाटात 35 वर्षीय अनोळखी इसमाचा खून झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आरोपींनी मयताची ओळख पटू नये यासाठी आधी चेहर्यावर दगडांचा मारा करून नंतर चेहरा जाळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध वनरक्षक दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.