पालच्या जनता स्कुलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

0

रावेर । तालुक्यातील पाल येथील संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था संचलित न्यू जनता इंग्लिश स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन समारोह चिमुकल्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश धनके होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या गोमती बारेला, हबीब तडवी, विवरा येथील रामदास वानखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष नरसिंग पवार, विकासो चेअरमन नगराम पवार, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, राहुल धांडे, विठ्ठल चव्हाण, धनसिंग पवार, लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते.

जनजागृतीपर नाटीकांनी वेधले लक्ष
यावेळी लहान चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक नृत्य, लावण्या, नाटिका सादर केल्या. बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वच्छ भारत अभियान या नाटिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका जयश्री सोनार, मोनिका सराटे, बबन पवार, अकलिम, मिलींद होले, सुरज सराटे, कुणाल माळी, सुनिल चव्हाण, मंदिर पवार, संतोष पवार आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन मुख्याध्यापिका शहनाज तडवी यांनी केले तर आभार संस्थाध्यक्ष विनय पवार यांनी मानले.