Pal’s wife dies during childbirth रावेर : तालुक्यातील पाल येथील सोनी इनेश बारेला (21) या विवाहितेला प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवार, 18 रोजी दाखल केले असता प्रसुतीदरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक किशोर सपकाळे करीत आहेत.