पालला अवैध वाहतुकीने घेतला चिमुकल्याचा बळी

0

रावेर: तालुक्यातील पाल येथील आठवडे बाजार परिसरात अंगणात खेळत असतांना रावेर-पाल अवैध वाहतूक करणारे वाहन क्रमांक एमएच 19 सी 5902 ने जबर धडक दिल्याने 4 वर्षीय चिमुकला जागीच ठार झाल्याची घटना 25 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी जमाव गोळा झाल्याने वाहनचालक शेख कालू शेख हुसेन याने पळ काढून पोलीस स्टेशन गाठले. अवैध वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात सापडला असून यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.