पालला 15 ते 18 दरम्यान मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर

0

डॉ.बी.बी.बारेला ; तीन दिवसीय शिबिरात विविध आजारांवर मोफत उपचार

रावेर- तालुक्यातील पाल ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्रक्रिया शिबिर 15 ते 18 मार्च होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांनी पत्रकार परीषदेत दिली. शुभारंभप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण अध्यक्षस्थानी असतील.

पहिल्या दिवशी तपासणी व भरती प्रक्रिया
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील हे प्रतिमा पूजन करून शिबिराचे उद्घाटन करतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.कमलापूरकर असतील. या शिबिरात अपेंडिक्स, हर्निया, मुतखडा, हायड्रोसील गर्भपिशवी, दातांच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, शरीरावरील गाठी आदी व्याधी असणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी आणि त्यांची भरती प्रक्रिया होणार आहे. 16 व 17 रोजी शस्त्रक्रिया करण्यात येतील व 18 रोजी सर्वांची तपासणी होवून पुढील निर्णय घेतला जाईल.

नामवंत डॉक्टरांची उपस्थिती
या शिबिरात वैद्यकीय महाविद्यालयाचे तसेच सामान्य रुग्णालय, जळगाव आणि विविध खाजगी क्षेत्रात कार्य करणारे नामवंत डॉ.किरण पाटील, डॉ.सुशांत सुपे, डॉ.चंद्रदीप पाटील, डॉ.दत्तात्रय बिराजदार, डॉ.शरद पाटील, डॉ.दत्तप्रसाद पाटील, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.उदय पाटील, डॉ.गुरु प्रसाद वाघ, डॉ.संदीप पाटील, डॉ.नारखेडे, डॉ.नितीन विसपुते, डॉ.विजय कुरकुरे, डॉ.पंकज पाटील, नेत्र विकार तज्ज्ञ डॉ.यु.बी.तासखेडकर, डॉ.मनोज पाटील, हेमाली पंडित, डॉ.राजेश पाटील, डॉ.गणेश राठोड यांच्यासह डॉक्टर उपस्थित राहून सेवा देणार आहेत. तालुकाभरातील नागरीकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी शल्य चिकित्सक डॉ.जयकर, डॉ.बी.बी.बारेला, डॉ.संदीप चौधरी यांच्यासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे. पत्रकार परीषदेला श्रीराम फाऊंडेशन सचिव दीपक नगरे यांची उपस्थिती होती.