जळगाव। शहरातील गणेश कॉलनी भागातील विजय कॉलनीतील एका बंद घराच्या कंपाऊंडमध्ये जमिनीवर पडलेल्या झाडाच्या पाला-पाचोळ्याला अचानक आगल्याची घटना सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. रहिवाश्यांनी अग्निशमन दल बोलविण्यानंतर आग विझविण्यात आली.
गणेश कॉलनी भागातील विजय कॉलनीत चौधरी कुटूंबियांचे घर आहे. घरातील सर्व सदस्य मुंबईला राहत असल्याने काही महिन्यांपासून घर बंद आहे. त्यामुळे घराच्या कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात झाडाचा पाला-पाचोळा साचलेला होता. आज बुधवारी सायंकाळी 4 वाजता या पाला-पाचोळ्याला अचानक आग लागली. कॉलनीतील रहिवाश्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ मनपा अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. काही मिनिटात अग्निशमन दलाने पाचारण करत जळत्या पाल्या पाचोळ्यावर पाण्याचा मारा करीत आग विझविली. दरम्यान, आगी कशामुळे लागली हे अद्याप समजून आलेले नाही. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांनी याबाबत दक्षता धेण्याचे आवाहन केले आहे.