पुणे । स्मार्ट सिटीसाठी महापालिका अधिकारी आणि पदाधिकार्यांची टूर इंग्लंडला निघाली आहे. या टूरचा सर्व खर्च तोच देश करणार असून, महापालिकेला केवळ पुणे ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास खर्च करावा लागणार आहे. या दौर्याला आणि खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांनी इंग्लडचा दौरा केला होता. त्यावेळी तेथील स्मार्ट सिटीच्या कामकाजाची भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकार्यांना याबद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती मोदी यांनी
केली होती. ती मान्य करत ब्रिटीश दूतावासाने महापालिका पदाधिकारी आणि अधिकार्यांना निमंत्रित केले आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बार्शीकर या दौर्यात सहभागी होणार आहेत. स्मार्ट सिटी म्हणून इंग्लंडमध्ये झालेल्या कामांची पाहणी, अधिकार्यांबरोबर चर्चा, पुण्यातील समस्या आणि त्यावरील उपाय याचा अभ्यास ही स्मार्ट टीम करणार आहे. 8 ते 14 जानेवारी या कालावधीत हा दौरा होणार आहे.