मुंबई : बेस्ट उपक्रमात खाजगी बस प्रवर्तनात आणण्यासाठीच मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता हे इच्छुक असून त्यामुळेच बेस्टला नवीन बस खरेदीस पैसे देण्यास ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आज बेस्ट समिती सभेत केला . पालिका आयुक्तांच्या ह्या भूमिकेमुळेच ३०३ पैकी राहिलेल्या ११५ बसगाड्या खरेदी करणे बेस्ट
दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या बसेसमुळे बेस्ट बसगाड्यांच्या प्रवर्तनावर परिणाम होत असून अनेक मार्गांवर जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे . बेस्टच्या आर्थिक परिस्तिथीमुळे गेल्या तीन – चार वर्षांपासून नवीन बसगाड्या खरेदी करणे शक्य झाले नव्हते. नवीन बस खरेदी करण्यासाठी बेस्टने मुंबई महापालिकेकडे आर्थिक मदतीसाठी विनंती केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पीय चर्चेत स्थायी समितीत बेस्ट बस घेण्यासाठी १०० कोटी मंजूर करण्यात आले होते. ह्या बसगाड्यांसाठी बेस्टने निविदा प्रक्रिया राबवून ३०३ बस घेण्यासाठी टाटा कंपनीकडे नोंदणी केली. ह्या १०० कोटी पैकी १० करोड रुपये इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी मंजूर झाले होते. त्यामुळे उरलेल्या ९० कोटींमध्ये १८५ बसगाड्याच बेस्ट घेऊ शकली. उरलेल्या ११८ बसगाड्यासाठी बेस्ट ला ५६ कोटींची आवश्यकता होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पालिका आयुक्तांनी बेस्टच्या ह्या मागणीकडे दुर्लक्ष केले.उर्वरित बसगाड्या घेण्याची आर्थिक क्षमता नसल्यानेच नाईलाजास्तव बेस्टलाही ह्या बसेसची मागणी रद्द करणे भाग पडल्याचे रवी राजा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी यावर तोडगा म्हणून राज्य सरकारच्या तेजस्विनी योजने अंतर्गत येणाऱ्या ११ कोटींचा निधी टाटाच्या उर्वरीत बसगाड्या खरेदी करण्यासाठी वापरण्यात यावा असे सांगितले . तर रवी राजा यांनी पालिकेने बेस्टकडून ह्या नवीन बसखरेदी पोटी घेतलेले जकातीचे व इतर कर मिळून असे एकूण २६ कोटी रुपये पालिकेने माफ करावे , व ते पैसे नवीन बस खरेदीसाठी द्यावेत अशी सूचना केली . ह्यावर बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी पालिका आयुक्त काहीहि एकूण घेण्याच्या तयारीत नसल्याने नवीन बसगाद्यापैकी ११८ बसेस खरेदी करणे शक्य नसल्याने सदर प्रस्ताव मंजूर करावा अशी विनंती केली , मात्र बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी ह्या प्रस्ताव पुनर्विचाराथ पालिका आयुक्तांकडे पाठविण्याचे आदेश बेस्ट महाव्यवस्थापकांना दिले .