पालिका आयुक्त लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेत नाही – आ. भोळे

0

जळगाव । महानगर पालिका ही आमदार राजुमामा भोळे, आमदार चंदुलाल पटेल यांच्या मतदार संघात येते. महानगर पालिका आयुक्त जीवन सोनवणे हे कोणत्याच कामाबाबतीत लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेत नाही, असा आरोप आमदार राजुमामा भोळे यांनी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत केले.

शासकीय प्रोटोकॉलनुसार मतदार संघातील आमदार खासदारांना विश्‍वासात घेतले पाहिजे आयुक्त लोकप्रतिनिंधींना विश्‍वासात घेत नाही त्यांच्या विधानसभेत हक्क भंगाची कारवाई करण्याची मागणी आमदार किशोर पाटील यांनी केली. अमृत योजनेंतर्गत राबविल्या जाणार्‍या योजनांबाबत कोणतीही माहिती देण्यात येत नाही अशी खंत भोळे यांनी व्यक्त केली. यावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मनपा आयुक्तांसोबत लोकप्रतिनिंधीची बैठक घेणार असल्याचे सांगितले.