नवी मुंबई । मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मनपा हद्दीतील अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचा निर्धार अतिक्रमण विभागाने केला होता. परंतु पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकार्यांनी स्वतःच अनधिकृत बांधकाम करत नियमांचे उलंघन केल्याचे आरोप करत व्यापार्यांनी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ऐरोली सेक्टर 5 मधील माऊली व्यापार संकुलाच्या मागील बाजूस झउ 2 हा उच्चदाब विजवाहिणीच्या खाली असणारा भूखंड सिडकोने मनपा प्रशानाकडे उद्यानासाठी 11 वर्षासाठी 2013 साली हस्तांतरित केला.
व्यापार्यांमध्ये नाराजी
हा भूखंड आणि माऊली व्यापार संकुल यांच्यामध्ये 15 फूट जागा सोडून बांधकाम करण्याच्या सूचना व नियम सिडकोने पालिकेला दिले होते. तशा प्रकारचे अॅग्रीमेन्ट ही झालेले आहे. परंतु पालिकेने थेट माऊली व्यापार संकुलाच्या मागे असलेली वहिवाट व अत्यावश्यक सेवाची वाहने येण्या पुरती असणारी 15 फूट जागा हडप केल्याने स्थानिक व्यापार्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
सिडको व पालिका चे अग्रीमेन्ट, हस्तांतरित जमिनीचा नकाशा सर्व खरी कागज पत्र असताना देखील कोणतेही अधिकारी मदत करत न असल्याची खंत व माऊली संकुल मधील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बांगर यांनी दर्शवली.