मुंबई । सध्या आपल्या पर्यावरणाची बिकट अवस्था झालेली दिसते. नद्यांमध्ये पाणी कमी कचराच जास्त दिसतो. याच नद्यांचे पुनर्जीवीन करण्यासाठी पालिकेने सकारात्मक पाऊल उचलण्याची तयारी दाखवली आहे. कर्दळीचे बेट बनवून त्यानुसार नद्यांचेजतन करण्यासाठी रिव्हरमार्चसोबत पालीकेने पाठींबा देण्याचे ठरवले आहे. मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा अभ्यास करून सबर्जित मुखर्जी यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने जुन्या प्लास्टिकच्या बॉटलच्या सहाय्याने कर्दळीचे बेट बनवून तो पोयसर नदीत सोडण्यात आला. कर्दळीचे झाड हे पाण्यातील घाण शोषून घेण्यासाठी लाभदायक आहे. तो सदस्यांनी यशस्वीपणे पार पाडला.
1 प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ओशिवरा, वलभट, दहिसर, मीठी नद्यांवरही हा प्रकल्प राबवून नद्यांना पुनर्जीवीत करण्याच्या उद्देशाने रिव्हरमार्चचे सरबजीत मुखर्जी, गोपाल झवेरी, अविनाश कुबल, सागर वीरा, अशोकनंद जवळगावकर, दिप्ती शर्मा, प्रफुल्ल चौधरी यांनी पालिकेशी चर्चा केली.
2 पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याप्रकल्पाबाबत सकारात्मकता दाखवत मुंबईतील इतर नद्यांवरही या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी पालीकेचा पूर्णपणे पाठींबा असेल असे आश्वासन दिले आहे. प्रथमदर्शनी सहाय्यक आयुक्त गायकवाड हे रिव्हरमार्चच्या संघटनांना मदत करणार आहेत. पालिका कार्यकर्त्यांना या प्रकल्पाला पूर्णपणे पाठींबा दिला असला तरी या प्रकल्पासाठी लागणारा निधी कार्यकर्ते सीएसआरद्वारे गोळा करणार आहेत.