पालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतनची थकबाकी या महिन्यापासून मिळणार

0

कल्याण : एप्रिल 2017 पासून महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असून यातील फरकाची थकबाकी सप्टेंबर महिन्याच्या पगारातून कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेतील 5 हजार 500 कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्या पासून पगाराच्या रकमेत सरसकट 2000 रुपये सहाव्या वेतन आयोगाची रक्कम दिली जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी आज जाहीर केले. ऐन सनाच्या मोसमात आयुक्तांनी कर्मचाऱयाच्या वेतन वाढीचा प्रस्ताव मार्गी लावल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केल्या नंतर या आयोगाची कल्याण डोंबिवली महापालिकेत केव्हा अमलबजावणी होणार याकडे सर्व कर्मचाऱ्याचे लक्ष लागले होते मात्र पालिकेची आर्थिक स्थिती पाहता थकबाकीच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत होती मात्र थकबाकीची रक्कम वाढत गेल्यास त्याचा आर्थिक ताण प्रशासनावर पडणार असल्यामुळे तिजोरीत उपलब्ध निधीचा आढावा घेतल्या नंतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकी पोटी सरसकट 2000 रुपये देण्याचा आदेश पालिका आयुक्त पी वेलारसु यांनी दिला आहे यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पगारात एप्रिल 2017 ते ऑगस्ट 2017 या 5 महिन्याच्या थकबाकीचे प्रत्येकी 10 हजार जमा केले जाणार असून त्यांनतरच्या प्रत्येक महिन्याच्या वेतनात हि 2000 रुपयााची वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अनेक महिन्या पासून प्रलंबित असलेली सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची फाईल आज आयुक्तांनी मंजूर केली यामुळे पालिकेच्या तिजोरीवर प्रति महिना 80 लाख याप्रमाणे वर्षभरात 9 .63 कोटी रूप्यायचा अतिरिक्त भुर्दंड बसणार आहे