पालिका खरेदी करणार अग्निशामक बचाव साधने

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागासाठी दोन कोटी रुपयांची अग्निशामक बचाव साधने साहित्य खरेदी करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत ऐनवेळी मान्यता दिली. महापालिकेच्या अग्निशामक विभागातील फायरमन यांच्यासाठी अग्निरोधक पोषाखाची आवश्यकता होती.

ईमर्जन्सी लाईट आणि विविध यंत्र सामुग्रीची मागणी विभागाने केली होती. हे साहित्य खरेदीसाठी पालिकेने निविदा मागविली होती. त्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वांत कमी दराची एस.एस. फलके अ‍ॅण्ड सन्स यांची दोन कोटी चार लाख 25 हजार रुपयांची निविदा स्वीकृत करण्यात आली. त्यांच्याकडून अग्निशामक विभागास आवश्यक अशी सहा अग्निशामक बचाव साधने साहित्य खरेदी करण्यासाठी दोन कोटी चार लाख रुपये देण्यास आणि त्यांच्याकडून साहित्य खरेदी करण्यास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.