पालिका निवडणुकीच्या वादातून नगरसेविका पतिस मारहाण

0

परस्पर विरोधी तक्रारीवरून दहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल ; एकास अटक

फैजपूर : नगरपालिका निवडणुकीत  पराभूत झाल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी नगरसेविका पती सह दोघांना मारहाण झाल्याची घटना दिनांक अकरा रोजी घडली होती त्यानंतर दिनांक 13 रोजी नगरसेविका पती मलक आबिद मलक  मुसा यांनी तक्रार दिल्यावरून पाच आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर  एजाज उर्फ गुड्डू यानेही आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार पोलिसात दिल्यावरून पाच जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे दंगलीच्या परस्पर विरोधी तक्रारी वरून दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे त्यापैकी एकाला  अटक करण्यात  आलेल्या आरोपीचे नाव शेख एजाज उर्फ गुड्डू शेख जाकीर असे आहे दिनांक अकरा च्या रात्री मलक आबिद मलक मुसा हे शहरातील दीपक आँटो जवळ उभे असताना आरोपी शेख एजाज शेख जाकीर, कामिल शेख करीम ,मोसिन शेख नासीर,जाकीर शेख करीम ,नासिर शेख करीम,सर्व राहणार तहानगर यांनी काहीएक कारण नसताना त्यांच्यासह कुटुंबीयांना शिवीगाळ केली तर शेख एजाज याने मलक आबिद यांच्या नाकावर फायटर ने ठोसा मारला मलक आबिद यांचे मोठे भाऊ शेख शरीफ घटनास्थळावर आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली याप्रकरणी मलका  आबीद त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून वरील सर्व आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान शेख एजाज उर्फ गुड्डू यानेही दिनांक 14 च्या रात्री तक्रार दिली त्यात त्याने दिनांक अकरा च्या रात्री गाडीला कट का मारला याचे कारण विचारण्यासाठी गेलो असता मलक आबिद मलक मुसा, मलक शरीफ मलक मुसा, मलक शाबीर मलक जाकीर, मलक जाबीर मलक जाकीर ,मलक समीर यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केल्याचे व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे तपास सपोनि दत्तात्रय निकम करीत आहे. दरम्यान नगरसेविका सायमा बी मलक आबिद त्यांनीसुद्धा शेख एजाज उर्फ गुड्डू यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून त्यात शेख एजाज हातवारे करून जिवे मारण्याची धमकी देत असतो असे म्हटले आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे