नवापूर । शहरात नगर पालिका निवडणुकीचा प्रशासकीय हालचाली सुरु झाल्या असुन जय्यत तयारी करण्यात येत आहे. नगर पालिका निवडणुकीसंदर्भात उपजिल्हाधिकारी तथा नवापूर नगर पालिका निवडणुक अधिकारी अर्चना पठारे यांनी नवापूर नगरीत भेट दिली. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार प्रमोद वसावे व सहायक निवडणुक अधिकारी राजेद्र शिंदे,पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत व नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांचाशी नगर पालिका निवडणुकीची तयारी ,मतदान केंद्र यांची सविस्तर माहिती घेऊन नंतर शहरातील 38 मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली.
अधिकार्यांना दिल्या सूचना
यावेळी त्यांनी विविध सुचना अधिकार्यांना केल्या मतदान केद्रावरील भौतीक सुविधा तसेच अपगांनावर चढण्याची व्यवस्था आदी माहिती जाणुन सुचना केल्या. काळंबा,लालबारी,करंजी ओवरा,तीनटेंबा,लहान चिंचपाडा,रेल्वे स्टेशन परिसर,प्रभाकर कॉलनी,मंगलदास पार्क,जनता पार्क येथील जि. प. शाळा,श्री शिवाजी हायस्कुल,वनिता विद्यालय,सुमाणिक विद्यालय,सार्व मराठी,गुजराथी हायस्कुल,जि प मराठी शाळा,तलाठी कार्यालय आदि मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी मतदान केद्र तसेच निवडणुक प्रक्रीया याविषयी माहिती दिली. यावेळी नगर पालिका कार्यालय निरिक्षक मिलिंद भामरे, लिपिक वाडेकर, सतिष बागुल, राजु गावीत, पो. का. निजाम पाडवी, महेद्र नगराळे आदि उपस्थित होते.