तळोदा। नगरपालिका सत्ताधिका-यानी पालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून शहरात विकास कामाचा सपाटा सुरु केला आहे. हे विकासकामे करताना योग्य नियोजनाचा अभावामुळे शहरातील नागरीक,विद्यार्थी,व्यापारी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे पालिका आधिकारी व पदाधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. तळोदा नगरपालिकेने गेल्या नोव्हेबर माहिन्यापासून मेनरोड क्रॉक्रेटिकरणाचे व आजूबाजूला गटारी नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम काम करताना हे काम अत्यंत मदगतीने सुरु आहे.
विकासकामे करताना योग्य नाही नियोजन
ज्यावेळी पाहिला पाऊस झाला. त्यावेळी पालिका प्रशासन जागी होवू गटार फोडून पावसाचे पाणी काढले सदर विकासकामे करताना योग्य नियोजन होणे अपेक्षीत असते.शहारात नवीन भूभागालगत जलवाहिनी टाकता ना देखील योग्य नियोजन करण्यात आले नाही यांचे परिणाम थोड्याच दिवसात दिसून येतील.गटार फोडून परत पूर्वी टाकलेली जलवाहीनीची भूमिगत खोली वाढून परत गटर बांधकाम सुरु आहे.गेल्या आठदिवसापासून मेनरोड बंद आहे. नागरीक, विद्यार्थी,व्यापारी,टेलिफोनविभाग यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गटरीवर बांधकाम व स्लॉब तसेच भूमिगत जलवाहीनी खोल टाकाण्यासाठी परत जो पैसा खर्च करण्यात आला. तो मुख्याधिकारी व पालिका बांधकाम आधिकारी यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा, अशी नागरिक मागणी करत आहेत.
रस्त्यावर वाहनाची मोठी वर्दळ
मेनरोड हा शहारातील मुख्यरस्ता आहे.हया रस्त्यावरुनच उपजिल्हा रुग्णालय कृषी उत्पन्न बाजार समिती न्यायालय आहे.त्यामुळे हया रस्त्यावर वाहनाची मोठी वर्दळ असते.शहारातील अर्धाभागातील विद्यार्थी कॉलेज व हायस्कूला जाणे विद्यार्थीदेखील याच मार्गाचा वापर करतात.शहारातील गल्ली बोळाना जोडणारा प्रमुख रस्ता आहे.सदर रस्त्याच्या कामाचे कुठले नियोजन नाही .गेल्या फेब्रुवारी-मार्च माहिन्यात नगरपालिकाजवळील गटारीचे काम करताना 15 दिवस रस्ता बंद करण्यात आला होता.
सणासुदीला रस्ता बंद
यावेळी ऐन सणासुदीला रस्ता बंद असल्याने कापड व्यापारी यांना मनस्ताप सहन करावा लागला. मार्च माहिना परिक्षा कालावधीत विद्यार्थांना अडथळा निर्माण होवून त्यांना गल्ली बोळामधून कॉलेज शाळा गाठाव्या लागल्यात.गटारीचे खोदकाम करताना टेलिफोन विभागाची भूमिगत केबल तुटून अनेक कनेक्शन बंद पडले होते.गटारी योग्य नियोजन न केल्याने गटरीवरील स्लॉब उंच झाल्याने कापडदुकानमध्ये पावसाचे पाणी जाईल म्हणून त्यांनी मुख्याधिका-याकडे मोर्चा नेला.आणि कामालाविरोध केला.पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले.