पालिका प्रशासकीय इमारतीला छत्रपतींचे नाव द्या- पप्पुदादा गुंजाळ प्रतिष्ठाण

0

चाळीसगाव-येथील नगरपालिका इमारतीला व सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वर्गीय लोकनेते पप्पूदादा गुंजाळ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहे. आज पालिकेच्या मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल पाटील, सचिन फुलवारी, रोशन चव्हाण, आप्पा पाटील, अजय चौधरी, स्वप्निल वैतकर, पवन सैंदाने, मनिष सैंदाने, भुषण गुजर, शुभम माने, सागर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.