पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार

0

नवापूर – नगर पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे इंदिरानगर मधील वयोवृद्ध दाम्पत्याचे हाल होत असुन नाल्यातील असलेली घाण व दुर्गधीयुक्त पाणी दुरावस्था यामुळे नाल्याजवळील लोकांना घरातुन बाहेर येता येत नाही. बाहेर आल्यावर घरात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असुन त्यांचा संघर्ष सुरूच आहे.

घराच्या प्रवेश दारावरच मोठा पाण्याचा प्रवाह असुन तेथेच नाला बांधकामाचे साहित्य पडलेले ते तसेच पडून आहे. तसेच पाणी जाण्यासाठी पुढे प्रवाह नाही त्यामुळे रहिवाशांना घराबाहेर पडणे बंद झाले असुन वयोवृध्दांचे हाल होत आहेत.