पालिका प्राणी संगोपन केंद्र उभारणार

0

येणार 33 लाख खर्च : स्थायी समितीसमोर प्रस्ताव
पिंपरी-चिंचवड : महापालिका बेवारस प्राणी आणि अपघातात जखमी झालेल्या पशु, पक्ष्यांचा सांभाळ करण्यासाठी प्राणी संगोपन केंद्र उभारणार आहे. नेहरुनगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळील उद्यान विभागाच्या जागेवर संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 32 लाख 68 हजार रुपये खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

जखमी पशु, पक्ष्यांचा सांभाळ
प्राणी संगोपन केंद्र उभारण्यासाठी सव्वा एकर जागेची आवश्यकता होती. नेहरुनगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळील उद्यान विभागाच्या जागेवर संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे. सामाजिक संस्था या केद्राची देखभाल करणार आहेत. पहिल्यांदाच असे केंद्र उभारण्यात येत आहे. संगोपन केंद्रात पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्यात येणार आहे. त्यामध्ये कुत्रा, मांजर, घोडा तसेच अपघातात जखमी झालेल्या पशु, पक्षींचा सांभाळ करण्यात येणार आहे.

बांधकामासाठी निविदा मंजुर
प्राणी संगोपन केंद्र बांधण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. मे.पी.ए. शिरोळे इंजिनियर्स कॉन्स्ट्रॅक्टर्स यांनी निविदा सादर केली होती. त्यांची निविदा 19 टक्के कमी दराने असल्याची स्वीकृत करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांच्यासोबत करारनामा करण्यात येणार आहे. काळभोरनगर, मोहननगर, रामनगर या परिसरात जलनि:सारण नलिका टाकण्यात येणार आहे. तसेच जलनि:सारण विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.