चाळीसगाव : नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार 5 जुलै 2017 रोजी नगरपालिकेच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेवेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. तब्बल 169 विषय असलेल्या या सभेत अनेक विषयांवर विरोधक असलेल्या लोकनेते देशमुख आघाडीच्या गटनेते राजीव देशमुख व नगरसेवकांनी तीव्र विरोध केला तर घनकचर्याची निविदा प्रक्रियेवरून चांगलीच खडाजंगी झाली.
यातील अनेक विषयांवर विरोधकांच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशालता चव्हाण होत्या. या सभेत आरोग्य सभापतींनी घन कचर्याची निविदा प्रक्रिया खुद्द आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील यांनी थांबविल्याचे सांगितल्याने सभागृहात एकाच गोंधळ उडाला. यावेळी आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील यांनी आपण असे सांगितले नसल्याचा खुलासा केला. घन कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेला उशीर का झाला? अशी विचारणा गटनेते राजीवदादा देशमुख यांनी विचारणा केल्यावरून आरोग्य निरीक्षक संजय गोयल यांनी वरील माहिती दिली. 4 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत शहरात 2 हजार वृक्ष लावण्यात येत आहेत. याबाबत मार्च महिन्यामध्ये ठराव केला असतांना देखील पालिकेने जुलै मध्ये पत्र व्यवहार केल्याचे सांगत गटनेते राजीव देशमुख यांनी नगरपालिका सत्ताधारी वृक्ष लागवड योजनेबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला. नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी घन कचर्याच्या ठेक्यावरून सत्ताधार्यांना विचारणा केली. घन कचर्याच्या ठरावाची प्रक्रिया 20 मार्च रोजी झाली.