पालिका सेवानिवृत्तांचा स्थायी सभापती मडिगेरी यांच्या हस्ते सन्मान

0

पिंपरी चिंचवड ः नगरपालिका ते महापालिका या प्रवासात सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचे मोलाचे योगदान आहे. असे मत स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून जुलै 2019 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार्‍या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 22 अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेतील कै. मधुकर पवळे सभागृह, मुख्य प्रशासकीय इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उच्चस्तर लघुलेखक मेधा साळुंके, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, कार्यकारी अभियंता केशवकुमार फुटाणे, लेखापाल आबासाहेब चौधरी, मुख्य लिपिक सुहास कुलकर्णी, सुमेध भोसले, सहाय्यक शिक्षक जगदीश काकडे, उपशिक्षक जरीना मण्यार, लिपिक धनंजय लोखंडे, वाहन चालक सुपडा टाकर्डे, हिरामण बागडे, सिस्टर इनचार्ज रसिका सावंत, मिटर निरीक्षक सुधाकर मोहीते, फिटर भारत जाधव, रखवालदार पंडीत वैरागे, सुधाकर पवार, अशोक लोहार, मजूर शांताबाई बुट्टे, तर स्वेच्छानिवृत्त होणार्‍यांमध्ये मुकादम विश्‍वनाथ आव्हाड, सफाई सेवक दुनघव यादवराव, कचरा कुली शंकर गायकवाड, मारूती भोईर आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. तर, आभार कामगार कल्याण विभागाच्या माया वाकडे यांनी मानले.