पालिकेचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा

0

कोंढवा : महापालिकेच्या बांधकाम विकास झोन दोन आणि चारच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येऊन सुमारे 8960 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. झोन दोनच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथील विनापरवाना बांधकामांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली. आंबेगाव बुद्रुक सर्व्हे नं. 43 येथील बजरंग शिंदे याचे 1600 चौ. फुट, सर्व्हे नं. 30 पार्ट येथील रणजित सिंग यांचे 80 फूट, हॉटेल चायना टाऊन यांचे 500 चौ. फुट असे एकूण सुमारे 2180 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई जेसीबी मशीन, ब्रेकर, गॅस कटर, बिगारी यांच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.

झोन दोनच्या वतीन कोंढवा खुर्द येथील विनापरवाना बांधकामांनाही नोटीस बजावण्यात आल्या. कोंढवा खुर्द मधील सर्व्हे नं. आठ अ’ आणि ब’ येथील एकूण 16 मिळकतींवर कारवाई करण्यात येऊन 2180 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. कात्रज येथील सर्व्हे नं 13 पार्ट, भैरवनाथ सहकारी सोसायटी, सर्व्हे नं 15 पार्ट, 16 पार्ट, सर्व्हे नं. 36-39 पैकी पांडुरंग पासलकर यांचे 450 चौ.फुट, युसूफ मेहबूब शेख यांचे 1050 चौ.फुट, लोकेश कासट यांचे 1600 चौ.फुट असे एकूण 3100 चौ.फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. या कारवाईत जेसीबी, दोन ब्रेकर, दोन गॅसकटर, बिगारी यांच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. झोन चारच्या वतीने लोहगाव विभागातील बॅक स्टेज हॉटेल, लोहगाव सर्व्हे नं. 207 पार्ट, वडगाव शेरी सर्व्हे नं. 33 पार्ट दिपील कातनानी यांचे एकूण 1500 चौ.फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.