पालिकेचा पाच दिवसांमध्ये 60 कोटी कर जमा

0

पालिकेच्या वेबसाइटरवही बिले पाहण्याची सुविधा

पुणे : महापालिकेतील मिळकतकरधारकांनी नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण वर्षाचा कर भरण्यास प्राधान्य दिले असून, पहिल्या पाच दिवसांत 60 कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. पालिकेच्या ऑनलाइन स्वरूपात कर भरण्याच्या सुविधेचा लाभ बहुतांश नागरिकांनी घेतला असून, त्याचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पालिकेने गेल्या महिनाअखेरीपासून मिळकतींची बिले पाठविण्यास सुरुवात केली होती. तसेच, नागरिकांना पालिकेच्या वेबसाइटरवही ही बिले पाहण्याची सुविधा आहे.

45 हजार नागरिकांचा ऑनलाइन करभरणा

पहिल्या दोन महिन्यांत पालिकेचा कर भरणार्‍या नागरिकांना 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे पहिल्या पाच दिवसांमध्ये 60 हजारांहून अधिक नागरिकांनी पालिकेचा कर भरला आहे. यामध्ये, ऑनलाइन किंवा डिजिटल माध्यमातून कर भरणार्‍या नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 45 हजार नागरिकांनी ऑनलाइन स्वरूपात करभरणा केला आहे.