पालिकेचा प्रारुप विकास आराखडा 2034 चे ‘डीपी रिमार्क्स’ऑनलाईन

0

मुंबई । बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात भूखंड विकसीत करताना विकास नियोजन आराखड्यानुसार दिले जाणारे ’डीपी रिमार्क्स’ महत्त्वाचे असतात. महापालिकेचा प्रस्तावित’प्रारुप विकास आराखडा 2034’ नुसार असणारे’डीपी रिमार्क्स’ देखील भूखंडावरील विकास प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता ’प्रारुप विकास आराखडा 2034’ नुसार असणारे ’डीपी रिमार्क्स’ ऑनलाईन उपलब्ध करुन दिले आहेत. ज्यामुळे संबंधितांना महापालिका कार्यालयात न येता ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरुन व अर्ज करुन काही मिनीटांत हे रिमार्क्स मिळविता येणार आहेत, अशी माहिती अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

महापालिका क्षेत्रात भूखंड विकसीत करणे, इमारतीचा पुनर्विकास करणे व कोणतेही विकास काम करताना ’डीपी रिमार्क्स’ प्राप्त करुन घेणे गरजेचे असते.या रिमार्क्समध्ये प्रामुख्याने भूखंडावर आरक्षण असेल तर त्याबाबतची माहिती,भूखंड कोणत्या क्षेत्रात आहे त्याची माहिती इत्यादी माहितीचा समावेश असतो. एखाद्या भूखंडाचे ’डीपी रिमार्क्स’मिळविण्यासाठी यापूर्वी महापालिकेच्या’नागरी सुविधा केंद्रात’ येऊन शुल्क अदा केल्यानंतर विकास नियोजन खात्याकडे अर्ज करावा लागत असे.त्यांनतर साधारणपणे 7 दिवसात हे ’डीपी रिमार्क्स’ मिळत असत.

’डीपी रिमार्क्स’ ऑनलाईन प्राप्त करुन घेण्यासाठीची पद्धत
1 महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर आपल्या डाव्या हाताला ’संबंधित दुवे’ (Related Links) असे शीर्षक असणार्‍या रकान्याच्या शेवटी’अधिक’ (More) या शब्दावर क्लिक करावे. यानंतर उघडणार्‍या पानावर ‘Draft DP 2034’ अशी लिंक आहे, त्यावर क्लिक करावे.

2 यानंतर उघडणार्‍या ’लॉग इन पेजवर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आपल्याला ज्या भूखंडाबाबत रिमार्क्स हवे असतील, तो भूखंड महापालिकेच्या 24 विभागांपैकी ज्या विभागात येतो तो विभाग निवडावा.

3 त्यानंतर भूखंडाचा सीटीएस / सीएस/ टीपी क्रमांक नमूद करावा. ऑनलाईन पद्धतीने आवश्यक शुल्क रकमेचा भरणा केल्यावर प्रारुप विकास आराखडा 2034 नुसारचे डीपी रिमार्क्स व नकाशा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होतील.युक्तांकडे केली आहे.