नवी मुंबई । नागरिकांचे मनपाच्या सरकारी वाहनांव्यतिरिक्त इतर कुणाच्याही वाहनांवर महापालिकेचा लोगो असणारा स्टिकर लावण्यास बंदी असताना सध्या विविध खाजगी वाहनांवर अश्या प्रकारचा स्टिकर पाहण्यास मिळत आहेत. या स्टिकर मुळे एखादा वाईट प्रसंग ओढावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा स्टिकर लावणार्या वहानांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या नवी मुंबई महानगर पालिकेत 111 नगरसेवक व 5 स्वीकृत नगरसेवक आहेत. परंतु यातील बहुतांशी नगरसेवक, त्यांचे स्वीय सहाय्यक, पत्नी, मुलं, कार्यकर्ते तसेच काही पालिका अधिकार्यांच्या वाहनांवर महापालिकेचा लोगो असणारा स्टिकर नियमबाह्य पाहण्यास मिळत आहे. नगरसेवक असे लोगोच्या खाली लिहिले गेले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पालिकेचा लोगो लावल्यामुळे नागरिकांना हा वाहन चालक व वाहनात बसलेला नागरिक नागरसेवकच असल्याचा भास होतो. त्यामुळे त्यांना समाजात चांगल्या प्रकारची वागणूक मिळत असते. तसेच हद्दीबाहेर गेल्या नंतर टोल तसेच गावाकडे जाताना अडचणी येत नसल्याने हे सुध्दा कारण लोगो लावण्यात असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. हा लोगो लावल्यामुळे एखादा गुन्हाही घडण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे. या लोगोचा वापर जास्त करून चमकेश लोक जास्त करून वापर करत असल्याचेही नगरसेवकांचे म्हणणे आहे.
कारवाईची मागणी
अश्या नागरिकांवर पोलीस व आरटीओ आधिकार्यांनी कारवाई करावी अशी मागणी अनेक नगरसेवक करत आहेत. याबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना विचारले आसता, पालिकेचे लोगो नियमबाह्य लावले गेले असतील तर नागरसेवकांना पत्र देऊन लागो काढण्याचे आदेश दिले जातील असे त्यांनी सांगितले.