पालिकेचे बनावट ओळखपत्र; तोतया कर्मचार्‍याला पकडले

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत मजूर पदाचे बनावट ओळखपत्र तयार करुन पालिका भवनात वावरणार्या एका तरूणाला सुरक्षारक्षकांनी पकडले. त्याला सुरक्षारक्षकांनी पिंपरी पोलिसांच्या हवाली केले आहे. संदेश रामचंद्र जाधव असे त्या तरूणाचे नाव आहे. त्यांना पालिकेच्या आरोग्य विभागाचे मजूर म्हणून असलेले ओळखपत्र घातले होते. तो पालिका भवनात चालक म्हणून वावरत होतो. त्याच्या हालचालीमुळे सुरक्षारक्षकाने सशंय आल्याने त्यांनी त्याला हटकले. चौकशी केली असता, तो पालिकेत कोणत्याही विभागात कामास नसल्याचे सहा महिन्यांपूर्वीची पुनरावृत्ती त्याला ताब्यात घेऊन पिंपरी पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्या संदर्भात सुरक्षा विभाग प्रमुख उदय जरांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. याच तरूणांने 6 महिन्यांपूर्वी पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून प्रवेश केला होता. त्यावेळी त्याला समज देऊन सोडून देण्यात आले होते. त्याने चिंचवड येथील एका व्यक्तीकडून पालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचे कबूल केले आहे. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.