पालिकेच्या गणेश स्पर्धा निकाल जाहीर

0

कल्याण । कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे श्री गणेश दर्शन स्पर्धा 2017 चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेकरीता एकूण 50 मंडळांनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेत भाग घेतलेल्या मंडळाचे परिक्षण करुन महापौर राजेंद्र देवळेकर यांना निकाल सुपूर्द केला. परिक्षक मंडळांनी पर्यावरणपूरक, इकोफ्रेंडली देखावा आणि शाडू मातीच्या मूर्ती यावर भर दिला. त्याप्रमाणे गणेश मंडळाची निवड केली. या स्पर्धेत गणेश मूर्तीकरीता कल्याण विभागातून प्रथम क्रमांक रामबाग मेन रोडवरील प्रबोधन मित्र मंडळने, द्वितीय क्रमांक कल्याण(पूर्व) परशुराम वाडी येथील श्री दत्त तरुण मित्र मंडळ, तृतीय क्रमांक कल्याण (प)जागृती चौक, बेतूरकर पाडा येथील जागृती मित्र मंडळची निवड करण्यात आली. तर कल्यान (प) आग्रा रोड येथील बालवीर गणेश मंडळ, शिवनेरी चौक, जोशी बागेतील शिवनेरी क्रीडा मंडळ, गांधी चौकातील सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडलाने उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली आहे. तर डोंबिवली विभागातूनप्रथम क्रमांक डोंबिवली पूर्व गोग्रासवाडी येथील गोग्रासवाडी गणेशोत्सव मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक डोंबिवली(प)शास्त्रीनगर, देवी चौक येथील जोशी मित्र मंडळ तृतीय क्रमांक डोंबिवली(पू) सुदाम डेरी, जिजाईनगर, संत नामदेव पथ येथील जिजाई नगर सार्वजनिक मंडळाची निवड झाली आहे.

श्री गणेशोत्सव मंडळाची ठरली उत्कृष्ट सजावट
डोंबिवली (पूर्व) मयुरदिप जवळ, राजाजी पथ येथील राजाजी पथ गणेशोत्सव मंडळ, पांडुरंगवाडी मानपाडा रोड येथील
मोरया मित्र मंडळने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तर उत्कृष्ट सजावटी करिता प्रथम क्रमांक श्री गणेशोत्सव मंडळ, लेले आळी, टिळक चौक, कल्याण (प), द्वितीय क्रमांक उत्कर्ष मित्र मंडळ, रामबाग ,कल्याण(प), तृतीय क्रमांक मुरारबाग मित्र मंडळ, मुरबाड रोड,सुभाष चौक, कल्याण (प)तर उत्तेजनार्थ विजय तरुण मित्र मंडळ, शिवराय मैदान, मुरबाड रोड, कल्याण (प)यांची निवड करण्यात आली.

विघ्नहर्ता मित्र मंडळ ठरले विशेष
डोंबिवली विभागातून प्रथम क्रमांक अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उमेश नगर, रेतीबंदर रोड, डोंबिवली (प),द्वितीय क्रमांक दत्तनगर उत्कर्ष मंडळ, शास्त्री हॉल, विठ्ठल मंदिर, डोंबिवली (पू), तृतीय क्रमांक गणेश मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव श्री सार्वजनिक गणेशोत्सव, गणेश मंदिर, डोंबिवली (पू) तर उत्तेजनार्थ एकता मित्र मंडळ, समाजमंदिर, नांदिवली रोड, डोंबिवली (पूर्व)निवड करण्यात आली. तर कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी साईकृपा कॉलनीमधील विघ्नहर्ता मित्र मंडळाची महापौरांच्या विशेष पारितोषिकासाठी निवड झाली.