पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहादा शहर समस्यांच्या विळख्यात

0

शहादा (जिजाबराव पाटील) । एकेकाळी शहादा शहर हे सुंदर शहर व विकासाचे शहर म्हणून आोळखले जात होते. जेव्हा धुळे जिल्हा होता तेव्हा धुळे जिल्ह्यात शहादा शहराचा विकासाचा हेवा वाटायचा. कै.पी.के.आण्णांनी शहराचे नाव उंचावर नेले आजही शहादा तालुका महाराषात पी. के.आण्णांच्या नावाने ओळखला जातो. पण गेल्या 10 ते 15 वर्षापासुन शहरावर दृष्टी क्षेप टाकला की शहर जैसे थे. सध्यास्थितीत शहराचा विकासाचा आलेख मायनस सुरू आहे.जे शिरपुर शहर विकासाच्या बाबतीत शहादाच्या मानाने खुपच मागे होते.पण आजच्या स्थितीत शिरपुरचा विकासाचा आलेख शाहादाहुन वरती आहे याचे नेमके कारण काय. शहराच्या विकास कामात नेमकी माशी कुठे शिंकली हेच कळायला मार्ग नाही. शहादेकरांनी मोठ्या आशेने सत्तांतर केल्यानंतरही त्यांना योग्य त्या मुलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

शहरातील समस्या
शहरातील नगरपालिका गेटवरच उघडे ड्रेनेज अपघाताला कारणीभूत ठरत आहे. डोगरगाव रोड वरील दुर्गधीयुक्त पाणी वाहत आहे. सार्वजनिक शैचालयाचा मैलादैखील या पाण्यातून वाहतो. अनेक भागात ड्रेनेजला झाकण नसल्यामुळे पावसाळ्यात विशेषता रात्रीच्या वेळी अंधारात किरकोळ अपघात घडत असतात. शहरातील बहुतांश भागातील रस्त्यावरील लोखंडी रॉड बाहेर निघाले आहेत. स्वामी समर्थ मंदिराजवळील रोड खराब झाला आहे. त्या रोडावरील तार व सलई रोडावर निघुन पडल्या आहेत. दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना डोके दुखी ठरत आहे. पालिकेत वेळोवेळी तक्रार देखील देण्यात आली. परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तसेच सरस्वती कॉलनी ते सप्तशृंगी मंदिर पर्यंतीची पाटचारीत पुर्ण दुर्गंधीयुक्त सांडपाणी आहे. त्यापरीसरातील नागरीकांनी वेळोवेळी पालीकेला कळविले मात्र परीस्थिती जैसेथे आहे. दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा समस्या पालिकेने सोडविली नसल्याने काही नागरीकांनी आपली घरे बदलणे पसंत केले आहे.

सत्ताधारी, विरोधकांनी विकासासाठी एकत्र यावे
शहरात जेव्हा पालीकेच्या निवडणुका येतात तेव्हा प्रत्येक पक्षाचे उमेदवार चौकाचौकातील सभेमध्ये शहादेकरांना विकासाचे आश्वासन देतात. पण निवडणूक संपली की आश्वासनही हवेत विलीन होतात. मग शहादेकर विश्वास तरी कोणावर ठेवणार. यावर्षी शहादेकरांनी पालीकेत सत्ता बदलली. प्रचारात शहरात गटारी,रस्ते,पाणी या समस्या एका वर्षात पुर्णकरू तुम्ही आम्हाला सत्ता द्या. आम्ही तुमच्या समस्या सोडवू असे आश्‍वासन दिले होते. मतदारांनी सत्ता दिली पण पालीकेत महाभारत पाहाला मिळत आहे. अजुनही जनतेला विश्वास आहे की ,पाच वर्षात शहराचा नक्की विकास होणार. सर्वांचे डोळे शहराच्या विकासाकडे लागले आहेत. जर सत्ताधारी व विरोधकांनी मतभेद विसरून एक दिलाने व एक मताने विकास कामे केली तर नक्कीच शहराचा विकास झाल्याशिवाय राहाणार नाही.सध्या स्थितीत तरी असा सुर शहादेकरांमध्ये उमटतांना दिसत आहे.

बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर अतिक्रमण
पार्किंग झोनची अवस्था वाईट आहे. ज्याला जिथे जागा मिळते तिथे वाहणे पार्कींग केली जातात. लॉरीधारक पटेल तिथे लॉरी उभी करून विक्री करतात. तसेच बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वार अतिक्रमणाचा विळख्यात असल्याने इतर वाहनेे रस्त्यात उभी राहत असल्याने चालकांना बस चालविण्याची कसरत करावी लागत आहे. या परिसरात दुकानांसमोर लावलेली ग्राहकांची बेशिस्त वाहने आणि हातगाड्यानी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेने येथील अतिक्रमण काढून पार्किंग झोन तयार केला होते. मात्र पालिकेने लक्ष न घातल्याने अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाल्याने वाहतुकीच्या समस्येचे पुन्हा डोके वर काढले आहे. कॉलनी परिसरात ओपन स्पेस जागेवर पालिकेने सुशोभित झाडे व गार्डन करावे व जेष्ठ नागरीक व महिला साठी बसण्यासाठी बागची व्यवस्था करावी तसेच नविन वसाहतीत गटारीचापश्न मार्गी लावावा.सोचखड्या भरला की नाईलाजाने सांडपाणी रोडावर जाते. निवडुन आलेले उमेदवार पाच वर्षात परिसरात दिसत सुध्दा नाही.असा सुर जनतेतुन उमटत आहे.

मी वेळोवेळी तक्रार करूनही माझ्या घरासमोरील पाटचारी (जैन प्लाझा समोरील ) तील दुर्गद्धी मीटत नव्होती शेवटी मी नविन वसाहतीत प्लाट घेउन घर बांधले.माझ्या तब्बेतीत सधारणा झाली.
धर्मेद्र तांबोळी शहादा.