पालिकेच्या दोन्ही संकूलांच्या दरांना मंजूरी

0

भुसावळ : पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गोपाळ नगरातील पालिका संकूलातील 158 गाळांच्या दराला सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या त्री सदस्यीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे आता या दोन्ही संकूलांच्या रखडलेल्या गाळ्यांच्या लिलावाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पालिकेने खान्देश विकास पॅकेज योजनेतून उभारलेल्या आरक्षण क्रमांक 106 च्या संकूलातील 69 व बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युनीसीपल संकूलातील 116 गाळ्यांच्या लिलावा पूर्वी नगररचना विभागाने प्रती चौरस मिटरचे दर जाहिर केले होते.

उपनगराध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश ; बेरोजगारांना दिलासा
या दरास प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व नगररचना विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे आता अनेक वर्षांपासून रखडलेल्या गाळे लिलावाचे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढेल. दरम्यान, ही बैठक रखडल्याने पालिकेने यापूर्वी 6 मे रोजी बैठकीच्या आयोजनासंदर्भात प्रांताधिकार्‍यांकडे पत्रव्यवहार केला होता. जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या आढाव्यातही हा मुद्दा चर्चेत आला होता तर भुसावळचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनीदेखील जिल्हाधिकार्‍यांकडे आग्रह धरल्यानंतर त्यांनी बैठक घेण्याचा आग्रह धरल्याने प्रश्‍न मार्गी लागला आहे. लोणारी यांची भूमिकादेखील यासाठी महत्त्वाची ठरली.