सभेच्या पटलावर 78 विषय ; विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
भुसावळ : पालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त गवसला असून मंगळवार, 12 रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा होणार आहे. सभेच्या पटलावर तब्बल 78 विषय आहेत. बहुचर्चित मामाजी टॉकीज रोडसह वरणगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न सभेत विषयाला मंजुरी मिळाल्यानंतर मार्गी लागणार आहे. पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवकांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. बहुमताच्या जोरावर सभेत सर्व विषयांना मंजुरी मिळते की शहर विकासाच्या विषयांवर सखोल चर्चा होते? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे 12 डिसेंबर रोजी मोठी लग्नतीथ असतानाच सभा होत असल्याने काही नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.