भुसावळ । पालिकेतर्फे राबविल्या जाणार्या स्वच्छता अभियानात सहभागी होत रामराज्य फाउंडेशनचे सचिव प्रा.धिरज पाटील यांच्या पुढाकाराने जीवन ज्योती सेंटर, वेडिमाता जेष्ठ नागरिक संघ, विद्यानगर मित्र मंडळ, राजेश्री संघमित्रा फाऊंडेशनतर्फे श्रीनगर, मथुरा अपार्टमेंट परिसर, अपूर्व प्लाजा, विठ्ठल मंदिर परिसर, विद्या नगर, वेडीमाता परिसरात सोमवार 15 रोजी स्वच्छता अभियान राबविले.
तरुणांनी दिलेले योगदान महत्वाचे
रामराज्य फाउंडेशनचे सचिव प्रा.धिरज पाटील, जिवनज्योती हेल्थ केअर चे केन्द्र संचालक गोपाल सोनवणे, प्रविण मालविया, राजेश्री संघमित्रा फाउंडेशनच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे, प्रा. प्रमोद शुक्ला, गजराज फाउंडेशनचे अध्यक्ष- विशाल ठोके, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, गायत्री परिवारचे माला दुबे, प्रा.सरोज शुक्ला,ललिता धांडे, नरेंद्र परदेशी, अर्चना झिंगरण, विनीत वारुळकर, चेतन निंबाळकर, मयूर चौधरी, वैभव पिसाळकर, ज्योती चव्हाण, प्रियंका वारुळकर, गौरव पिसाळकर, चेतना वाघुळदे, दर्शन नेहेते, शामकांत जोशी, गणेश पाटील यांनी सहभाग घेतला.
नगरपालिकेतर्फे 2 ट्रॅक्टर व एक जेसीबी तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते. या परीसरातुन 14 ट्रॅक्टर कचरा संकलन करण्यात आला. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक वसंत पाटील, आरोग्य अधिकारी फालक उपस्थित होते. यावेळी घंटागाडीमध्ये कचरा टाकण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. श्रीनगर, मथुरा अपार्टमेंट परीसरातील नागरिकांसोबत कचरा कमी कसा होईल या बाबत चर्चा झाली.