पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत रोहिदास यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य विलास मडिगेरी, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्य भिमा बोबडे, सह आयुक्त दिलीप गावडे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले, सा.प्रगत भारतचे संपादक दत्ताञय कांबळे, चर्मकार संघटनेचे अध्यक्ष संतोष वाघमारे, चर्मकार संघटनेच्या महिला अध्यक्ष कविता सोनवणे, माजी वृक्ष प्राधिकरण सदस्य गोरोबा गुजर, उद्दोजक संदिप बागडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश साळवे, ज्ञानेश्वर कांबळे, अर्जुन रामगुडे, अरूण बागडे, अध्यक्ष सुनिल रोकडे, सरचिटणीस सागर भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.