भुसावळ । काही दिवसांपुर्वी जनाधार पक्षाचे गटनेते उल्हास पगारे यांनी कक्षाचा ताबा घेवून कर्मचार्यांना शिवीगाळ केलयाची तक्रार भाजपा नगरसेवकांनी केली होती. मात्र हे खोटे आरोप असून पालिकेतील बंद पडलेले सीसीटीव्ही कार्यान्वित केल्यास सर्व व्यवहार समोर येतील, अशा आशयाची मागणी नगरसेवक अॅड. तुषार पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी निवेदनात नमूद केले की, गटनेता उल्हास पगारे यांसह इतर नगरसेवक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेतील एक कक्ष उघडून त्याठिकाणी साफसफाई करुन बैठक व्यवस्था केली. यासाठी पालिकेतील कर्मचार्यांनी स्वतःहून मदत केली. मात्र भाजपकडून खोटे आरोप लावण्यात येत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कार्यान्वित केल्यास कर्मचार्यांना मारहाण किंवा शिवीगाळ कोण करतो, याची शहानिशा नियमित होत राहील. तसेच चौकशीसाठी पोलीस प्रशासनास देखील याची मदत होईल, असे नमूद करण्यात आले आहे.