कॅमेरे फेस डिटेक्टींग आणि आवाज रेकॉर्ड करणारे
पुणे : पालिकेच्या मुख्य इमारतीची सुरक्षा व्यवस्था आणखी हायटेक करण्यात आली असुन यासाठी नव्याने 76 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे फेस डिटेक्टींग आणि आवाज रेकॉर्ड करणारे आहेत. सुमारे 40 लाख रुपये खर्चून हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे इमारतीचा परिसर आणखी सुरक्षीत होण्यास मदत होणार असून पालिकेत होणार्या चोर्या, मारहाण तसेच तोडफोडीच्या प्रकारांनात दोषी व्यक्ती निश्चित करण्यासाठी याची मदत होणार आहे.महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या सुरक्षेसाठी यापूर्वी 26 ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, ती मर्यादीत असल्याने तसेच त्याची देखभाल दुरुस्ती नियमित होत नसल्याने अनेकवेळी त्याचा फायदाच प्रशासनास होत नव्हता. त्यामुळे जुन्या मुख्य इमारतीसाठी नव्याने सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेत सुमारे 76 ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
तपासाच्या दृष्टीने या कॅमेर्यांचा मोठा फायदा
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वार, प्रत्येक मजल्यावरील पोर्च तसेच जिन्यांसह इमारतीच्या आत येण्याच्या प्रवेशद्वारांवरही हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हंजे हे कॅमेरे फेस डिटेक्शन करणारे उच्च क्षमतेचे असून त्यात आवाजाचे रेकॉर्डींग करण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना, चोरी, वादाचे तसेच मारहाणीचे प्रकार घडल्यास तपासाच्या दृष्टीने या कॅमेर्यांचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, जुन्या इमारती सोबतच लवकरच नवीन इमारतीमध्येही हे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.